श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज
श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज मूळ गाव वाराणशी. महादेव भटजी पिता पार्वती माता वाराणशी
येथील.त्यांचे पोटी श्री दत्त आवतरी ब्रह्मानंद
महाराजांचं जन्म झाला.
वयाच्या आठवे वर्षी माता पिता
यांचे वैकुंठवासी झाले.महाराज फिरत फिरत काशीला आले .
तेथे केशवानंद महाराज कडून दिशा घेतली.
साधना करणेसाठी त्यांनी कुंडल पलूस तालुका येथे वीरभद्र डोंगरा वरती तपस्या साधना केली.
येथे
महाराज सिद्ध झाले.त्यांनी तेथे बरचेस चमत्कार केले .
हे सर्व ब्रह्मानंद चरित्र ग्रंथ मध्ये आहे .महाराज तेथून बहे बोरगाव येथे येवून बरेच दिवस
राहिले .
लोकांचं भक्तिभाव वाढीस लावून लोकांना सन्मार्गला लावले अखेर
बुरुंगवाडी
तालुका पलूस जिल्हा सांगली येथे जिवंत समाधी घेतली .
आश्विन शुद्ध द्वितीया शके 1830 रोजी समाधी घेतली .
महरांजाचे शिष्य नामानंद महाराज राहणार बार्शी..त्यांचा मठ बहे बोरगाव जिल्हा सांगली येथे आहे
.
नामानंद महाराज यांचे शिष्य स्वामी वेदांनंद महाराज महापूर .
या आश्रमाचे सर्व व्यवहार श्री ब्रह्मानंद ट्रस्ट पाहते.
श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज यांची आश्रम ठिकाणे
1.बुरुंगवडी तालुका पलूस जिल्हा सांगली
2.बहे बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली.
3.कुंडल वीरभद्र डोंगर.
4.महापूर जिल्हा लातूर.
5.दर्जी बोरगाव जिल्हा लातूर.